- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या सुरुवातीपासूनच गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात जाऊन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तळागळातील बहिणींना लाभ मिळावा; यासाठी प्रयत्न केलेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म स्वतः वाटप केले होते.अशातच वर्षाताई यांनी अधिकाऱ्यांना भेटून योजना घराघरात कशी पोहोचली पाहिजे; यासाठी सुद्धा पाठपुरावा केला होता.बऱ्याच अंगणवाडी सेविकांना भेटून मार्गदर्शन केलेत आणि महिलांना जास्तीत-जास्त लाभ देण्याविषयी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यासोबत चर्चा करून सहकार्य करावे; अशी मागणी त्यांनी केली होती.त्यानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ दिनांक-१४ ऑगस्ट पासून ते आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे.रक्षाबंधनापूर्वीच योजनेचा लाभ मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थी महिलांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह गडचिरोली जिल्ह्याच्या शिवसेना महिला संपर्कप्रमुख वर्षाताई जितेंद्र मोरे (कुंभारे) यांचे सुद्धा आभार मानले असल्याने वर्षाताई मोरे यांनी केलेल्या प्रयत्नांचे एकप्रकारे फलितच म्हणावे लागेल.
- Advertisement -

