Thursday, October 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सरकारी तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.आज,गुरुवार १ ऑक्टोंबरच्या सकाळीच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ जाहीर केली आहे.मात्र,घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देत कुठलीही दरवाढ करण्यात आलेली नाही.प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला आंतरराष्ट्रीय प्रमाणित दर आणि परकीय चलन दरांच्या आधारावर एलपीजीच्या दरात सुधारणा केली जाते. विशेषतः व्हॅटसारख्या स्थानिक करांनुसार प्रत्येक राज्यातील दर हे वेगवेगळे असतात.सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज गुरुवारी १९ किलोच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ केली आहे.विशेष म्हणजे,देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे दर हे वेगवेगळे राहू शकतात.काही ठिकाणी ६६ रुपयांनी तर इतर शहरांमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडर तब्बल ७१.५० रुपयांपर्यंत महाग झाला आहे.ऐन सणासुदीच्या काळात व्यवसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ ही न पचणारी बाब आहे.कारण याच महिन्यात दुर्गा उत्सव व दसरा सण असल्याने सण-उत्सव पाहून खिशाला कात्री लावण्याचा प्रयोग झाल्याचे दिसून येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

अखेर धावत्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या आरोपीस अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २५ सप्टेंबरच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बोरखेडी परिसरात घडली...

दुर्गम भागातील विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करा-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षल प्रभावित असलेल्या दुर्गम व अतिसंवेदनशील भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे.रस्ते,पूल,मोबाईल कनेक्टिव्हिटी,आरोग्य व शिक्षण...

सरकारी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर न्यायालयाने कडक शब्दांत ओढले ताशेरे..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत,' अधिकारी वेळेत काम करत नसल्याने नागरिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागते आणि अशा याचिकांमुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!