Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवारांना; आज शपथविधी सोहळा संपन्न..

महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवारांना; आज शपथविधी सोहळा संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा तसेच रिक्त झालेले उपमुख्यमंत्री पद कुणाच्या पदरी पडणार?अश्या चर्चांना उधाण आले असतांनाच काल शुक्रवारी वेगवान राजकीय घडामोडी घडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि आज,शनिवार ३१ जानेवारी सायंकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.त्या राज्याच्या १३ व्या उपमुख्यमंत्री झाल्या असून पहिल्यांदाच महाराष्ट्राला महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत.मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा मुंबईच्या लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली.त्यानंतर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांची निवड करण्याचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला.त्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले.त्यानंतर सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार)पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र सादर करण्यात आले.
शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती सोपवली जाणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानुसार,त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क,क्रीडा आणि युवा व अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.तर,अर्थमंत्री खाते वगळण्यात आले आहे.अर्थमंत्री खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!