Tuesday, July 7, 2026
Homeगडचिरोलीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.. - मतपत्रिकेद्वारे...

महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.. – मतपत्रिकेद्वारे होणार मतदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे सदस्य निवृत्त झाल्यामुळे,भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार,वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक प्राधिकारी मतदार संघांतंर्गत १८ मे २०२६ पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.
  •  निवडणूक कार्यक्रम👇
  • अधिसूचनेची प्रसिद्धी- २५ मे २०२६
  • नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची अंतिम तारीख- १ जून २०२६
  • नामनिर्देशन पत्राची छाननी-२ जून २०२६
  • उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख- ४ जून २०२६
  • मतदानाचा दिनांक- १८ जून २०२६
  • मतदानाची वेळ- सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
  • मतमोजणी दिनांक-२२ जून २०२६
  • निवडणूक प्रक्रिया संपुष्टात येण्याची तारीख- २५ जून २०२६
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी चंद्रपूर,तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर,निवासी उपजिल्हाधिकारी वर्धा व निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली असणार आहेत.
वरील निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उपरोक्त तिन्ही जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या एकूण ४० स्थानिक स्वराज्य संस्थेतील ९७७ पात्र मतदार मतपत्रिकेद्वारे आपले मतदान नोंदविणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!