Monday, June 8, 2026
Homeगडचिरोलीमहाकाली महोत्सवात "गोंडवानाचा महायोध्दा" क्रांतिवीर बाबूराव शेडमाके नाटकाचे आयोजन. ..

महाकाली महोत्सवात “गोंडवानाचा महायोध्दा” क्रांतिवीर बाबूराव शेडमाके नाटकाचे आयोजन. ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचे रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची,आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” नाटकाचा प्रयोग दि.२१ ऑक्टोंबर २०२३ ला दु.२ वा.चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी सदर नाटकाचे लेखन केले असून,प्रसिद्ध गायक,दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्या लोकजागृती संस्था,चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.

सिनेस्टार मुन्ना बिके,निखिल मानकर,राजरत्न पेटकर,  संजीव रामटेके,सुरज चौधरी,गुरू मोहूर्ले,अविनाश कडूकर,अमित दुर्गे,यश शेंडे,वेदांत मेहता,अंकुश शेडमाके,भाष्कर मडावी,शुभम गुरनुले,गणेश मडावी, मयुर मस्के,अनुराग मुळे,स्नेहल वाडगुरे इ.पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम,रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे,प्रियंका सिडाम,माधुरी ढोरे,मनिषा बावणे,प्रविण लाडवे,संजना येलेकर,राजश्री,स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,नवी दिल्ली यांचे “नाट्य प्रशिक्षण शाळेत” प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत.रेला नृत्य,आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे.प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे असल्याने याचा लाभ घेण्यात यावा; अशी मागणी करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव ट्रॅव्हल्सची ट्रकला जोरदार धडक; १५ प्रवासी गंभीर जखमी,तर १२ प्रवासी किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पुणे येथून नागपूरच्या दिशेने निघालेल्या  एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्समधील तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले,तर १२ जण किरकोळ...

वैनगंगा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू; पाच जण थोडक्यात बचावले..

उद्रेक न्युज  भंडारा :-जिल्ह्याच्या करचखेडा येथील वैनगंगा नदी बेटावर एका खासगी बोटीद्वारे आंघोळ करण्यासाठी गेलेल्या सात तरुणांपैकी परतीच्या वाटेवर असतांना नदीतील पाण्यात बोट उलटल्याने दोन...

आता विदर्भातील हत्तींची तयार होणार स्वतंत्र ओळख नोंदवही.. – वन विभागाच्या सहकार्याने हत्तींच्या हालचालींवर राहणार वैज्ञानिक पद्धतीने नजर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील...

नक्षलवादाच्या खात्म्यानंतर गडचिरोलीत विकासाचा नवा आराखडा.. – स्थानिक तरुणांचे कौशल्यविकास,पायाभूत सुविधा, वनहक्क आणि सेवा वितरणावर भर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांना मागे हटण्यास भाग पाडल्यानंतर आता त्या भागात निर्माण झालेली प्रशासकीय पोकळी नागरी प्रशासनाने प्रभावी सेवा,विकासकामे आणि जनसंपर्कातून भरून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!