Wednesday, September 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमशिन घेतली; पण खराब निघाली..! रक्कम परत करण्यास कंपनीचा नकार.. -शेतकऱ्याची ग्राहक...

मशिन घेतली; पण खराब निघाली..! रक्कम परत करण्यास कंपनीचा नकार.. -शेतकऱ्याची ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव; कंपनीला दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-ग्राहक हा बाजारपेठेतील राजा मानला जातो.जर कां ग्राहकांनी एखाद्या वस्तूवर वा साहित्य खरेदीवर बहिष्कार टाकला वा ती वस्तूच खरेदी केली नाही तर..तुमच्या उत्पादनाला काहीही किंमतच उरणार नाही.त्यामुळे ग्राहकांशी पंगा घेणे चांगलेच महागात पडू शकते आणि अश्याच प्रकारचा ग्राहक शेतकऱ्याशी घेतलेला पंगा एका कंपनीला चांगलाच महागात पडला आहे.शेतकऱ्याने शेतात केळीची लागवड करण्यासाठी एका कंपनीकडून “रोटा कल्टिव्हेटर रिगर मशीन” बोलावली आणि कंपनीला ८० हजार रुपये अदा केले.रक्कम दिल्यानंतर कंपनीने मशिन पाठवली.मात्र, वापरण्यात येणारी मशिन काम करत नसल्याने शेतकऱ्याने कंपनीशी संपर्क साधून माहिती दिली असता कंपनीने पाठविलेला व्हिडिओ पाहून मशीनचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.तरीही मशिन काम करीत नव्हती.त्यामुळे कंपनीने दुसरी मशिन पाठवली.दुसरी मशिनही काम करीत नसल्याने शेतकऱ्याने दिलेले ८० हजार रुपये परत देण्याची विनंती केली.पण कंपनीने कुठलाही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे शेतकऱ्याने यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत कंपनीने केलेल्या कारस्थानाचे कथन केले.त्यानुसार, यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र उल्हास मराठे,सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत तक्रारीवर सुनावणी झाली.यामध्ये ॲग्रीनिर ॲग्रो मशीनरी प्रा.लि.ने सदोष सेवा दिल्याचे स्पष्ट झाले आणि शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय देण्यात आला. प्रकरणी कंपनीने श्रावण राठोड यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे ५ हजार रुपये व कंपनीला मशिनसाठी दिलेले ८० हजार रुपये परत करून एकूण ९५ हजार रुपये द्यावे, असा आदेश पारित केला.श्रावण देवीदास राठोड रा.सुयोगनगर,यवतमाळ असे शेतकऱ्याचे नाव असून सातारा येथील ॲग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड,असे कंपनीचे नाव आहे.विशेष म्हणजे,कंपनीने शेतकऱ्यास मशीन पाठविल्यानंतर प्रशिक्षण देणे आवश्यक होते.त्यातच,दोन्ही मशिन सदोष देऊन ग्राहकाची फसवणूक केली आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन केले.प्रकरणी आयोगाने कंपनीला दणका दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!