Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीमराठवाड्यात चुडाराम बल्हारपुरे "तिफण" पुरस्काराने सन्मानित.. - राज्यस्तरावर मिळालेला सातवा पुरस्कार..

मराठवाड्यात चुडाराम बल्हारपुरे “तिफण” पुरस्काराने सन्मानित.. – राज्यस्तरावर मिळालेला सातवा पुरस्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच मराठवाड्याच्या संभाजीनगर येथे झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार व साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. तिफण त्रैमासिक व तिफण वाचक चळवळ,कन्नड जि.संभाजीनगर यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता तिफण राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी तीनशे साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात मराठी नाट्यवाड्.मय प्रकारात नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या महानाट्यास यंदाचा नाट्यलेखनाचा महात्मा फुले उत्कृष्ट नाट्यलेखन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संभाजीनगर येथील महात्मा गांधी स्मारक निधी भवनात झालेल्या तिफण पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे,(ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक),डॉ.ललिता गादगे(ज्येष्ठ लेखिका)यांचे हस्ते प्राचार्य डॉ.विजय भोसले(शिवाजी महाविद्यालय कन्नड),डॉ.सर्जेराव जिगे(मराठी अभ्यास मंडळ, औरंगाबाद),प्रा.डॉ.रमेश जाधव(मराठी विभाग प्रमुख,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद),डॉ.मच्छिंद्र गोर्डे(कार्याध्यक्ष,महात्मा गांधी स्मारक निधी भवन),प्रा.डॉ.शिवाजी हुसे(संपादक तिफण),प्रा.डॉ.दिलीप बिरुटे(अध्यक्ष,तिफण वाचक चळवळ),प्रा.डॉ.रामचंद्र झाडे,डॉ.नवनाथ गोरे(सदस्य, संपादक मंडळ)आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी मराठवाड्यात मिळालेला हा दुसरा पुरस्कार आहे,तर राज्यस्तरावर मिळालेला हा सातवा पुरस्कार आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल झाडीपट्टीत सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे, रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम, नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर, डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक)यांचेसह साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!