Tuesday, July 21, 2026
Homeगडचिरोलीमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चांदीची छत्री नेली चोरून..-मंदिर समितीच्या सदस्यांकडून ठाण्यात तक्रार दाखल…

मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी चांदीची छत्री नेली चोरून..-मंदिर समितीच्या सदस्यांकडून ठाण्यात तक्रार दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या गडचिरोली-साखरा दरम्यानच्या गोगाव येथील डांबर प्लांटमधील साईबाबा मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचा २४ हजार रुपये किंमतीची चांदीची छत्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना काल,शनिवारी ६ जुलै ला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गडचिरोली-साखरा मार्गावर गोगावजवळ साईबाबा मंदिर आहे.येथे अनेक भाविक मंदिरात दर्शनासाठी जातात.हे मंदिर परिसरातील नागरिकांचे श्रद्धेचे स्थान आहे.विशेषतः साईबाबांच्या मूर्तीवर भाविकांनी चांदीचे छत्र चढविले होते.ज्याची किंमत २४ हजार रुपये असल्याची माहिती आहे.दरम्यान,शनिवारी सकाळी अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून चांदीची छत्री चोरून नेली.ही बाब निदर्शनास येताच मंदिर समितीच्या सदस्यांनी गडचिरोली पोलिस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली.त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!