Tuesday, July 21, 2026
Homeगोंदियाअन् महिला सरपंचाने युवकाच्या लगावली कानशिलात…

अन् महिला सरपंचाने युवकाच्या लगावली कानशिलात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- राज्यात मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले,कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत.त्यातच तालुक्यातील नवेगावबांध ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणल्याची घटना गुरुवारी ४ जुलै ला घडली.मारहाण करणाऱ्या नवेगावबांध ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाचे नाव हिराबाई नीलमचंद पंधरे (रा.खोली नवेगावबांध) असे आहे. आशिष सुभाष लंजे वय २० वर्षे हा युवक नवेगावबांधच्या सरपंच हिरा पंधरे यांच्याकडे गुरुवारी दि.४ जुलै ला दाखला मागण्यासाठी गेला होता. दरम्यान पैश्यांचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन सरपंच हिराबाई पंधरे यांनी युवकाच्या कानशिलात हाणली. युवक आशीष लंजे हा नवेगावबांध येथील रहिवासी असून; ग्रामपंचायत नवेगावबांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डन वर काम पाहत होता.येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य करत होता.काही दिवसाआधी त्याला कामावरून काढण्यात आले होते.सरपंच हिराबाई पंधरे यांनी आशिष लंजे याला पैशाचा हिशेब न दिल्यामुळे कानशिलात लगावल्याचे पोलिस ठाण्यात कबूल केले.युवकाने सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात नवेगावबांध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!