Saturday, August 1, 2026
Homeगडचिरोलीभामरागड तालुक्याच्या जहाल नक्षलवाद्यास जंगल परिसरातून अटक..!

भामरागड तालुक्याच्या जहाल नक्षलवाद्यास जंगल परिसरातून अटक..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील परायणार गावाचा रहिवासी असलेल्या एका ३२ वर्षीय जहाल नक्षलवाद्यास जवानांनी भामरागड तालुक्याच्या तिरकामेटाच्या जंगल परिसरातून अटक केली आहे. काल,शनिवारी विशेष अभियान पथकातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांनाच ताडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या तिरकामेटा जंगल परिसरात एक संशयित व्यक्ती आढळून आला.त्यास ताब्यात घेऊन अहेरी येथील प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात नेऊन चौकशी केली असता,चौकशीअंती तो शंकर भिमा महाका वय ३२ वर्षे,रा.परायणार, ता.भामरागड,जि.गडचिरोली येथील असून भामरागड दलमचा सदस्य असल्याचे निष्पन्न झाले.तो घातपात करण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात रेकी करीत असल्याचेही स्पष्ट झाले.२१ जानेवारी २०२२ रोजी भामरागड तालुक्यातील धोडराज-इरपणार मार्गावरील पेनगुंडा रस्त्याच्या कामावरील दोन कोटी रुपये किंमतीच्या १९ वाहनांची जाळपोळ नक्षल्यांनी केली होती.याप्रकरणी लाहेरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शंकर महाकाला अटक करण्यात आली होती.शंकर महाका हा २०१६ पासून २०२२ पर्यंत नक्षल्यांच्या जनमिलिशियामध्ये कार्यरत होता.त्यानंतर तो भामरागड दलमचा सदस्य झाला.सदरची कारवाई नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल,गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान)एम.रमेश,अप्पर पोलिस अधीक्षक (प्राणहिता)सत्यसाई कार्तिक,पोलिस उपअधीक्षक (अभियान)विशाल नागरगोजे व भामरागडचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!