Friday, August 7, 2026
Homeगोंदियाभरधाव कंटेनरने दुचाकीला धडक देताच एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी…

भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक देताच एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.तोच आज मोठा अपघात गोंदियातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सकाळी घडला.अपघातात भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे.तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे.

चंद्रशेखर साखरे वय ४५ वर्षे असे अपघातात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे.चंद्रशेखर साखरे हे मुलाला घेऊन आपल्या दुचाकीने कोहमारावरून देवरीकडे जात होते.या दरम्यान नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने डोंगरगावजवळ त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.मागून धडक बसल्याने दोघे जण पुढे फेकले गेले.यात दुचाकीस्वार चंद्रशेखर साखरे हे कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याच्या जागीच मृत्यू झाला.दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा १५ वर्षीय मुलगा मासूम साखरे हा बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मदतीला आले. यानंतर त्यांनी जखमी मुलास उपचारासाठी देवरी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!