Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीबांधकाम साहित्य चाचणी न करता; निकृष्ट दर्जाची  विविध कामे -शासकीय कामांत भ्रष्टाचारास...

बांधकाम साहित्य चाचणी न करता; निकृष्ट दर्जाची  विविध कामे -शासकीय कामांत भ्रष्टाचारास प्रोत्साहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- कामाच्या ठिकाणी विविध साहित्ये वापरली जातात. मात्र वापरलेल्या साहित्यांची शासकीय कामांमध्ये प्रयोगशाळेतून चाचणीच केली जात नसल्याचे दिसून येते.आज शासकीय कामे भरपूर प्रमाणात केली जात आहेत.जसे,इमारत बांधकाम,रस्ते बांधकाम,नाली बांधकाम,पाणी साठवणुकीसाठी बंधारे बांधकाम,सिमेंट-काँक्रीट बांधकाम व इतर अशा अनेक प्रकारची बांधकामे शासकीय स्तरावर केली जातात.शासकीय स्तरावर कामे तर केली जातात परंतु या कामांची जसे,सिमेंट,डांबर व इतर साहित्यांची प्रयोगशाळेतून चाचणी वा तपासणीच केल्या जात नसल्याची बाब समोर आली असल्याने,केलेल्या शासकीय बांधकामांवर भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

खरं-तर काम सुरू करण्यापूर्वी सिमेंट,डांबर व इतर साहित्याची प्रयोगशाळेतून चाचणी करून घेणे आवश्यक असते.खरोखरच सिमेंट,डांबर व इतर साहित्ये योग्य प्रतीचे आहे किंवा नाही.यामध्ये काय-काय वापरले गेले आहे तसेच बांधकाम टिकाऊ होणार किंवा नाही तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊ नये यासाठी चाचणी अहवाल महत्वाचा ठरतो.मात्र शासकीय कामात असे चालत नाही.’चलती का नाम गाडी’असे केल्या जाते.त्यामुळेच बांधकामे एक वर्षही होत नाही तर फुटके-तुटके स्वरूपाचे होऊन भंगार स्वरूपाचे झालेले दिसते.तसे अधिकारी वा कर्मचारीही अंगाला हळद लावून घेत नसतात.त्यामुळे ठेकेदार वा कार्यान्वित यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करून आपली पोळी साधण्याचा प्रयत्न करीत असतात.आज कित्तेक कामे शासकीय स्तरावर,शहरी व ग्रामस्तरावर केली जातात मात्र याकडे कुणी लक्ष घातले आहे कां?नाही तर अशा कामांवर साहित्य चाचणी अहवाल घेणे गरजेचे असून,या बाबत शासकीय स्तरावर दखल घेणे गरजेचे आहे.अन्यथा विकास कामे न होता झकास कामे झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!