Friday, June 12, 2026
Homeनागपूरबांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून सरकारची दिशाभूल करीत योजनेचा लाभ घेतल्याचे उघड होताच अधिकाऱ्यांनी कुही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.या प्रकरणाचे धागेदोरे कुही तालुक्यासह उमरेड व भिवापूर तालुक्यांपर्यंत पोहोचले आहेत.त्यानंतर उमरेड पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता(बीएनएस)कलम ३१८(४) व ३३६ (३)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात आधी झेरॉक्स दुकानदार अंकुश चिंतामण भुजबळ वय ३२ वर्षे,रा. बेसूर,ता.भिवापूर,जि.नागपूर, बोगस प्रमाणपत्र घेणारे हरेश शामराव दमके वय ५८ वर्षे,रा.बाम्हणी,ता.उमरेड,जि.नागपूर, प्रफुल्ल किशोर पाल वय २८ वर्षे,रा.बुधवारी पेठ, उमरेड व एजंट गणेश ईश्वर मानकर वय ३५ वर्षे, रा.आपतूर,ता.कुही,जि.नागपूर या चौघांना आणि नंतर बोगस प्रमाणपत्र घेणारे परमेश्वर गोविंदा देशमुख वय ४३ वर्षे,रा.आपतूर,ता.कुही,भाऊराव रामचंद्र पडोळे वय ४६ वर्षे,रा.वेलतूर,ता.कुही,जि.नागपूर व एजंट गणेश ईश्वर मानकर वय ३० वर्षे,रा.आपतूर, ता.कुही या चौघांना अटक केली.या प्रकरणात सूरज निनावे,रा.भिवापूर व भिवापूर येथील निखिल झेरॉक्सचा मालक या दोघांवर नव्याने गुन्हे दाखल केल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.या प्रकरणात आधी तिघांना अटक केल्याने अटकेतील आरोपींची संख्या ११ झाल्याने बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट दूरवर पसरल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी काळात संभाव्य एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या योजनांची प्रलंबित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!