Saturday, September 12, 2026
Homeगोंदियाबांधकाम कामगार मंडळात कार्यरत डेटा एन्ट्री ऑपरेटरने कामगारांचे पैसे हडपले... - लाभार्थ्यांचे...

बांधकाम कामगार मंडळात कार्यरत डेटा एन्ट्री ऑपरेटरने कामगारांचे पैसे हडपले… – लाभार्थ्यांचे बँक खाते बदलून ५ लाख ६१ हजार रुपये टाकले आपल्याच खात्यावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-बांधकाम कामगार मंडळातर्फे नोंदणीकृत लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.काहींना पेटी तर काहींना ५ हजाराचे लाभ देण्यात येते.अशातच कामगारांना मिळणारी रक्कम एका कंत्राटी कर्मचाऱ्याने स्वतःच्या खात्यावर वळती केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.इमारत व इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या लाभाच्या योजनांचे पैसे कॉम्प्युटर ऑपरेटरने आपल्या खात्यात वळती केल्याप्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी उमेश रोशनलाल बिसेन रा.सावरी हा इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ येथे कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर पदावर कार्यरत होता.त्याने १५ फेब्रुवारी ते १२ जून २०२४ या काळात बांधकाम मंडळातील लाभार्थ्यांचे बँक खाते बदलून लाभार्थ्यांचे ५ लाख ६१ हजार रुपये आपल्या खात्यावर वळती करून शासनाची फसवणूक केली. अविनाश लक्ष्मण ढोके वय ५३ वर्षे,रा. प्रतापनगर, नागपूर यांच्या तक्रारीवरून २२ नोव्हेंबर रोजी शहर पोलिसांनी आरोपी उमेश बिसेनविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४२०,४१७,४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार धीरज राजूरकर करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!