Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीअनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा परीक्षा पुर्वप्रशिक्षण... - प्रशिक्षणा दरम्यान मिळणार दरमहा १...

अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता स्पर्धा परीक्षा पुर्वप्रशिक्षण… – प्रशिक्षणा दरम्यान मिळणार दरमहा १ हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता एमपीएससी (MPSC) पुर्व प्रशिक्षण जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS,SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणाऱ्या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोदंणी कार्ड (EMPLOYMENT CARD )असणे आवश्यक आहे.प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे.प्रशिक्षणा दरम्यान १ हजार रुपये दरमहा विद्यावेतन दिले जाणार आहे.प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते.कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत.तसेच अर्ज दिनांक -१ नोव्हेंबर २०२४ पासुन ते २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कार्यालयात सादर करावेत.तदनंतर मुलाखत २९ नोव्हेंबर २०२४ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता माहीती व मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे त्याकरीता उपस्थ‍ित राहावे;अधिक माहितीसाठी ८४८५८१४४८८(8485814488) या क्रमाकांवर संपर्क साधावा; असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!