- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी हजारी पार केली आहे.अश्या परिस्थितीत केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठा झटका दिला आहे.विशेष म्हणजे,प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून वार्षिक ९ सिलेंडर आणि त्यावर प्रत्येकी ३०० रुपयांचे थेट लाभाचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायचे.मात्र,आता अनुदान मिळणाऱ्या रिफिल सिलिंडरांची संख्या वर्षातील ९ वरून कमी करून ४ करण्यात आली आहे.उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आता वर्षातील पहिल्या ४ रिफिल सिलिंडरवर प्रत्येकी ३०० रुपयांचे थेट लाभ हस्तांतरण(डीबीटी)मिळणार आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते,उज्ज्वला योजनेतील एका कुटुंबाची सरासरी वार्षिक एलपीजी खपत सुमारे ४ रिफिल इतकी असल्याने अनुदानाची पात्रता त्यानुसार निश्चित करण्यात आली आहे.सुधारित निकष हे उज्ज्वला लाभार्थी कुटुंबांच्या प्रत्यक्ष सरासरी गॅस वापराचा विचार करून ठरविण्यात आले आहेत.सदरच्या निर्णयामुळे ५ सिलेंडरचा आर्थिक ताण उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर पडणार आहे.
- Advertisement -

