Tuesday, October 27, 2026
Homeगडचिरोलीपोलीस-नक्षल चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा..

पोलीस-नक्षल चकमक; एका नक्षलवाद्याचा खात्मा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नक्षलविरोधी अभियान राबवित असतांनाच सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले असून घटनास्थळावरून एके-४७ व एसएलआर रायफलसह  इतर नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान,आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सी-६० पथकाचा एक जवान जखमी झाला असून जखमी जवानास उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे.अद्याप जवानांकडून जंगल परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत असून याबाबत अधिकची माहिती स्पष्ट केली जाणार आहे.सदरची चकमक ही छत्तीसगडच्या नारायणपूर तर महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हा सीमेवरील घनदाट जंगल परिसरात घडली.
छत्तीसगड तसेच नक्षलवादी संघटनेच्या १० कंपनीच्या उरल्या-सुरल्या नक्षलवाद्यांच्या हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार, भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले.नारायणपूर-गडचिरोली सीमेवर व्यापक शोधमोहीम सुरु करण्यात आली.दरम्यान,
काल बुधवारी नक्षलवाद्यांशी काही काळ चकमक उडाली.यात नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात आले.त्याचवेळेस,घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पसार झाले.परत आज,गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अभियान अधिक तीव्र करत अतिरिक्त सी-६० पथक व केंद्रीय राखीव दलाचे क्यूएटीचे एक पथक क्षेत्रात दाखल करण्यात आले.आज सकाळपासून अधूनमधून चकमक सुरु होती.जवानांचा वाढता प्रभाव बघता एका पुरुष नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला असून मृत नक्षलवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही.चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत अधिकृत माहिती गडचिरोली पोलीस दलाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेत एमएसडब्लू विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्य संपन्न; विविध उपक्रमांतून सामाजिक जागृती..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथील एमएसडब्लू(MSW) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे २१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर २०२६...

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!