Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीपूरबाधित शेतकरी बांधवांच्या नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा करा…-काँग्रेस कामगार कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष...

पूरबाधित शेतकरी बांधवांच्या नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा करा…-काँग्रेस कामगार कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा,कुरूड,वीर्शी,आमगाव,सावंगी व इतर गावातील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कृत्रिमरीत्या आलेल्या महापूराने वेढा घालून धान पीक तसेच इतर लागवडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अशातच जवळपास आठ महिन्यांचा कालावधी लोटूनही पूरबाधित शेतकरी बांधवांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नसल्याने पूरबाधित शेतकरी बांधवांच्या नुकसानभरपाईची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करण्यात यावी; अशी मागणी काँग्रेस कामगार कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी केली आहे.

मागील वर्षीच्या सप्टेंबर,ऑक्टोंबर २०२३ रोजी कृत्रिमरीत्या म्हणजेच पावसाच्या पाण्याचा जलसाठा धरणांमध्ये वा इतर शासकीय धरण बांधकाम  असलेल्या ठिकाणी क्षमतेपेक्षा,अवाढव्य झाल्यास इतरत्र म्हणजेच नदी,नाले वा इतर ठिकाणी सोडून सर्तकतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात येतो. सर्तकतेचा इशारा जरी प्रशासनाकडून दिला जात असला; तरीही शेतातील उभे असणारे पीक तसेच इतर लागवड करण्यात आलेली पिके घरी घेऊन तर जाणार नाही? त्यामुळेच पूरबाधित शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होऊन कित्तेक महिने लोटून गेलेत; मात्र कुणालाही जाग आली नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.

ज्यावेळेस पूरबाधित क्षेत्र निर्माण झाले; त्यावेळेस देसाईगंज तालुक्यातील तलाठ्यांनी पंचनामा करून गावातील शेतकरी बांधवांचे खाते क्रमांक तसेच आधार क्रमांक मागवून तहसील कार्यालयास एकूण पूरबाधित क्षेत्र- ७६४.०३ असून ११९१ शेतकरी पूरबाधित आहेत व त्यांची एकूण रक्कम १ कोटी २९ लाख ८८ हजार ५१० रुपये एवढी असून सदरच्या 

याध्या दिनांक- ९ ऑक्टोंबर २०२३ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत.मात्र कित्तेक महिने लोटूनही अजून पावेतो पूरबाधित शेतकरी बांधवांच्या नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्याचे नावाच घेत नसल्याने; नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा करावी; अशी मागणी काँग्रेस कामगार कमिटीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके केली आहे.अन्यथा ‘जोर का झटका धीरे से’ असेही त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!