Tuesday, August 18, 2026
Homeनागपूरपहिल्यांदा लाचेची मागणी; संशय येताच हात झटकले.. - मेयो हॉस्पिटलच्या वैद्यकिय मंडळाचे...

पहिल्यांदा लाचेची मागणी; संशय येताच हात झटकले.. – मेयो हॉस्पिटलच्या वैद्यकिय मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व लघुलेखक एसीबीच्या ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तीन महिने वैद्यकीय रजेवर असल्याने तीन महिन्यानंतर कार्यालयात रुजु होण्यासाठी वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नागपूरच्या मेयो हॉस्पिटलच्या वैद्यकिय मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख व लघुलेखक यांना नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी प्रकरणी आज,मंगळवार ३० जून रोजी ताब्यात घेतले.विशेष म्हणजे,लाच घेत असतांना दोघांनाही संशय येताच लाच रक्कम स्वीकारण्याचे टाळले.मात्र,रकमेची मागणी केल्याने एसीबीच्या पथकाने दोघांच्याही मुसक्या आवळल्या.
प्रकरणातील तक्रारदार हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,वर्धा येथे नेमणुकीस आहे.तक्रारदार हे तीन महिण्यांपासून वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांना कार्यालयात रुजु झाल्यावर तीन महिन्यांच्या वैद्यकीय कालावधीसाठी वैद्यकीय मंडळासमोर उपस्थित राहून वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि प्रमाणपत्र आणण्याकरिता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय(मेयो हॉस्पिटल)नागपूर येथे पाठविले होते.तक्रारदार हे वैद्यकिय मंडळापुढे उपस्थित झाले असता तेथील वैद्यकिय मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.नंदकिशोर कमलनारायण जैस्वाल आणि लघुलेखक आशिष मेटेकर यांनी तक्रारदार यांना वैद्यकिय मंडळाची शिफारस आणि प्रमाणपत्र देण्याकरिता ३० हजार रुपये लाचेची मागणी केली.त्यानुसार,तक्रारदार यांनी नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारदार यांचे तक्रारीचे अनुषंगाने सापळा अधिकारी यांनी लाचेच्या मागणीबाबत पडताळणी कार्यवाही केली असता २४ जून २०२६ रोजी आरोपी डॉ.नंदकिशोर जैस्वाल व आशिष मेटेकर यांनी तक्रारदार यांना वैद्यकीय मंडळाची शिफारस आणि प्रमाणपत्र देण्याचे कामाकरिता ३० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली.मात्र,दोघांनाही तक्रारदार यांचेवर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्विकारलेली नाही.त्यानुसार,आज सोमवार ३० जून २०२६ रोजी डॉ.नंदकिशोर कलमनारायण जैस्वाल,वैद्यकिय मंडळ अध्यक्ष तथा प्राध्यापक विभाग प्रमुख,शल्यचिकित्सा विभाग,इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय नागपूर व आशिष मेटेकर,लघुलेखक,इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरूध्द पोलीस स्टेशन तहसिल,नागपूर शहर येथे लाचेच्या मागणीबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर,विजय माहुलकर अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक महेश भोरटेकर,पोलीस उपअधीक्षक श्रीमती भारती गुरनुले यांचे पर्यवेक्षणात सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंन्द्र वैरागडे,सापळा पथक पोहवा आशिष वैद्य,विलीन तांबडे,करूना सहारे,अस्मिता मेश्राम,गिता चौधरी,पोशि होमेश्वर वाईलकर,प्रफुल भातुलकर,स्वाती हिंडोरिया चालक मपोशि हर्षलता भरडे यांनी केलेली आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,गडचिरोली,चंद्रपूर या जिल्ह्यांतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम(एजंट)यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशिर शासकीय शुल्का व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नागपूर येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.तक्रारदारांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्यात येईल व तक्रारदार यांचे सापळा कारवाईत वापरण्यात आलेली रक्कम ही एक महिण्याचे आत परत केल्या जाईल.तसेच तक्रारदारांचे शासकीय विभागात अडकलेले वैध कामही पुर्ण करून दिले जाईल.
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे खालील क्रमांकावर संपर्क साधावा👇
१. पोलीस अधीक्षक कार्यालय दुरध्वणी क्र. ०७१२-२५६१५२०,
२. टोल फ्री क्रमांक : १०६४, व्हॉट्सॲप क्र. ९०६७६७१०६४
३. डॉ.दिगंबर प्रधान,पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र. ९९२३१८५५६६
४. श्रीमती माधुरी बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर मो.क्र. ७०३८४३६४४१
५. विजय माहुलकर,अप्पर पोलीस अधीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र. ९९२३१४२५६९
६. राजीव कर्मलवार,वाचक पोलीस निरीक्षक,लाप्रवि नागपूर मो.क्र.९०२१४५२७६०
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू,पत्नी गंभीर जखमी.. – देसाईगंज-आरमोरी मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज-आरमोरी मार्गावर जणूकाही अपघातांच्या मालिकांचे सत्र सुरू झाले की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.नुकताच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज-आरमोरी मार्गावरील कुरुड...

अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलाची केली हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-भंडारा शहरातून आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एका शाळकरी मुलाच्या हत्येने संपूर्ण शहर हादरून...

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!