Thursday, July 9, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपनीर विक्रीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; केंद्र सरकारकडून दखल..

पनीर विक्रीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; केंद्र सरकारकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पनीरला बाजारात मोठी मागणी असते.विशेषतः लहान मुलांना सर्वात जास्त पनीर खायला आवडते.मात्र,काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ॲनॅलॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून आल्याने महाराष्ट्रानंतर आता केंद्र सरकारने ‘आर्टिफिशियल पनीर’ म्हणजेच चीज ॲनॅलॉगवर मोठा निर्णय घेतला आहे.फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाच्या(एफएसएसएआय) नियमांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.पुढील महिन्याच्या १ मेपासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर भर दिला जाणार आहे.अन्न सुरक्षा आणि मानके(लेबलिंग व डिस्प्ले नियमन)२०२० च्या नियमांनुसार,विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती रेस्टॉरंट,हॉटेल,कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स,डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.
विशेष म्हणजे,पनीर फक्त दूध फाडून बनवले जाते.तर चीज ॲनॅलॉगमध्ये पाम तेल,स्टार्च आणि दुधाचे घन पदार्थ वापरले जातात.पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कॅल्शियम असते.तर चीज ॲनॅलॉगमध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात.खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते.तर चीज ॲनॅलॉग रबरासारखे,चिवट आणि थोडे तेलकट असते.चीज अनॅलॉग हे खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त असते.चीज अनॅलॉग दीडशे ते दोनशे,अडीचशे रुपये किलो दराने मिळते.तर पनीरचा दर साडे तीनशे ते चारशे रुपये किलो आहे.वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज ॲनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केला जातो. चीज ॲनॅलॉग खाल्ल्याने मेद वाढणे,कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. पनीरऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून चीज अनॅलॉग वापरणे ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.त्यामुळे, विधीमंडळ अधिवेशनात भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांनी आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. त्यानुसार,आता १ मे पासून पनीर ऐवजी चीज ॲनॅलॉग म्हणून मेनू कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे.मेनू कार्डमध्ये बदल न केल्यास एफडीए आणि एफएसएसएआयकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना देखील पनीर खातांना ते आर्टिफिशियल पनीरसारखे लागले,तर त्यांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले जात आहे.यामुळे,शुद्ध पनीर विक्रीच्या नावाने होणारी ग्राहकांची फसवणूक टाळली जाऊ शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यांना म्हणतात खरे ‘लोकसेवक’..! आरोग्य उपकेंद्रात अचानकपणे मध्यरात्रीच धडकले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कोणी कितीही मोठा अधिकारी कां असेना..! तो शासनाचा नोकर,तर जनतेचा लोकसेवक म्हणून शासनाकडून पगार घेतो.पण,काही अधिकारी स्वतःला मोठे अधिकारी समजून खुर्चीच्या...

गडचिरोली शहरासाठी २३ किलोमीटर लांबीचा चारपदरी बायपास रोड प्रस्तावित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग व...

आता गावातील स्मशानभूमीचा दाखल द्या अन् विविध योजनेचा निधी मिळवा.. – ग्रामीण भागात तब्बल ७ हजार ४४४ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागात आजही तब्बल ७ हजार ४४४ म्हणजेच जवळपास २० टक्के गावांमध्ये स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात नागरिकांना मरणयातना सहन कराव्या...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; लॉज मालकाविरुद्ध गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-नुकतेच चार दिवसांपूर्वी वर्धा शहराच्या कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात स्वतःच्याच घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी रंगेहाथ अटक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!