Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीपत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.. -मनावर घेत...

पत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.. -मनावर घेत राहत्या घरी गळफास घेवून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकाच गावात वास्तव्यास असणाऱ्या दोघांनीही १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला.वैवाहिक जीवनात दोन अपत्ये झाली.दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली.अश्यातच दोघांच्याही सुखी संसारास कुणाची तरी नजर लागली आणि दोघांमध्ये वाद सुरू झाले.अश्यातच पत्नी माहेरी निघून गेली ती तब्बल दीड वर्षे घरी परतलीच नाही.पती पत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.त्याच्या मनाला चटका लागला आणि तब्बल १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या प्रेमाचा शेवट पत्नीने घेतलेल्या एका निर्णयामुळे झाल्याची धक्कादायक घटना काल रविवारी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात उघडकीस आली.मानसिक तणावात गेलेल्या पतीने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.सुधाकर नाजुकराव मडावी वय ३६ वर्षे रा.येरकड,ता.धानोरा, जि.गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या येरकड गावातील मनीषा केशव उसेंडी व सुधाकर मडावी यांचा प्रेमविवाह १३ वर्षांपूर्वी झाला होता.सुखाने संसार सुरू असतांनाच अचानक पती-पत्नीत वादविवाद झाल्याने पत्नी मनीषा ही एप्रिल २०२४ मध्ये आपल्या आई- वडिलांकडे निघून गेली. तेव्हापासून ती सासरी परतलीच नाही.त्यामुळे सुधाकर जून २०२५ मधे चेन्नई येथील खासगी कंपनीत कामासाठी गेला होता.कामासाठी गेलेला सुधाकर आठवडाभरापूर्वीच परत आला होता आणि पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला.मात्र सासू-सासऱ्यांनी मुलीला पाठविण्यास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या
सुधाकरने राहत्या घरीच गळफास घेवून आत्महत्या केली.
  • मृताचे वडील नाजुकराव मडावी👇
माझा मुलगा पत्नीला आणायला सासर मंडळीकडे गेला असता,त्यांनी त्याला हात धरून घराबाहेर काढले.मुलगी पाठवत नाही,वेळ आल्यास माझ्या मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून देतो,असे ठामपणे सांगितले.ही बाब त्याने मनावर घेत आत्महत्या केली.माझ्या मुलाच्या आत्महत्येस त्याच्या सासरकडील मंडळीच जबाबदार असून पोलिस विभागाने योग्य चौकशी करून कारवाई करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!