Sunday, August 30, 2026
Homeगडचिरोलीपंतप्रधान मोदींच्या ४०० पारसाठी अशोक नेतेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा….-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

पंतप्रधान मोदींच्या ४०० पारसाठी अशोक नेतेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा….-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांनीआज, मंगळवारी (दि.२६) लोकसभा निवडणुकीसाठी आपले नामांकन अर्ज दाखल केले. वासेकर लॉन येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पंतप्रधान मोदीच्या विकसीत भारतासाठी ४०० खासदार निवडून आले पाहिजे; असे भाजपाचे स्वप्न आहे.तेव्हा अशोक नेते यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा तर गडचिरोली जिल्हयात मोठे उद्योगधंदे निर्माण करू व गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगारी हटवू; असे फडणविस यांनी म्हटले आहे.प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मोदीजींच्या विकसीत भारतासाठी अशोक नेते यांना विजयी करून विरोधकांची अनामत जप्त झाली पाहिजे.कांग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या गळाला लागत आहेत पुन्हा काही नेते भाजपात येणार आहेत.तेव्हा भाजपाच्या उमेदवारांच्या पाठीसी सर्वांनी एकजुटीने उभे राहून अशोक नेते यांना विजयी करा. अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम,ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार,यांचीही भाषणे झालीत.आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया,माजी आमदार अतुल देशकर,माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम, यांच्यासह महायुतीमधील भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.सकाळी ११ वाजता भाजपाच्या कार्यालयातून ढोल तास्याच्या गजरात वासेकर लॉन येथे प्रचंड सभा पार पडली.२०० गाड्याचा ताफा तर प्रचंड गर्दी झाली होती.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,जिल्हाध्यक्ष ॲड.येशूलाल उपराडे,जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार,डॉ.नितीन कोडवते,डॉ.चंदाताई कोडवते,डॉ.मिलिंद नरोटे डॉ.शामजी हटवादे, संजय गजपुरे,भारत खटी,प्रणय खुणे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सभापती इचोडकर,उपसभापती विलास दशमुखे,सदानंद कुथे, सुनिलभाऊ पारधी देसाईगंज तालुकाध्यक्ष,गोविंद सारडा, योगिता पिपरे,किसान आघाडीचे रमेश भूरसे,जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, जिल्हाध्यक्ष गीता हिंगे,जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,आशिष पिपरे,अरूण हरडे, यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, लोकसभा निवडणुक प्रमुख किशन नागदेवे आदिची प्रमुख उपस्थिती होती.अबकी बार ४०० पार चा नारा देत भाजपाचे खासदार अशोक नेते यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला.कार्यक्रमाचे संचलन रविंद्र ओल्लालवार यांनी तर आभार प्रकाश गेडाम यांनी मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!