Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीनुकसानभरपाईची केवायसीही केली; पण खात्यात दमडीही जमा नाही झाली..

नुकसानभरपाईची केवायसीही केली; पण खात्यात दमडीही जमा नाही झाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात मागील खरीप हंगामात ऐन धान कापणी सुरू असतांना ऑक्टोंबर-२०२५ मध्ये अवकाळी पावसाने झोडपले.महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आणि केवायसीही केली.मात्र,अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही जमा झाली नाही.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून नुकसाभरपाईची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत.
खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने धानपीक जोमात होते.ऑक्टोंबर २०२५ मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले.कापणी केलेल्या कडपा बांधात पाणी साचल्याने पूर्णतः सडून गेल्या.आडवे पडलेल्या धान लोंबाला अंकुर फुटले.या नुकसानीचे कृषी विभाग, महसूल विभागाकडून पंचनामे युद्धस्तरावर करण्यात आले.संबंधित विभागाकडून नुकसानग्रस्तांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाई मिळेल,अशी आशा होती.मात्र,अद्याप एकाही  शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची दमडीही जमा झाली नाही.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नसतांना स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईच्या मदतीच्या भरवशावर रब्बी पिकाचे नियोजन केले.मात्र भरपाईच मिळाली नसल्याने रब्बी पिकाचे नियोजन करतांना शेतकऱ्यांना आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!