Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीवळण मार्गावर स्कॉर्पिओ वाहन आणि ट्रॅव्हल्सची धडक; ५ जणांचा मृत्यू तर ११...

वळण मार्गावर स्कॉर्पिओ वाहन आणि ट्रॅव्हल्सची धडक; ५ जणांचा मृत्यू तर ११ जण गंभीर जखमी.. – आज सायंकाळच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात आज,रविवार २९ मार्च रोजी भीषण अपघाताची घटना घडून अपघातात तब्बल ५ जणांचा मृत्यू झाला,तर ११ जण गंभीर जखमी झाले. सदरची घटना आज सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर घडली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मृतांची नावे-अनिकेत बर्लावार वय २६ वर्षें,रा.भाडभीडी,आरोही मोगरकर वय ८ वर्षें रा.गट्टेगुडा,सुमन गव्हारे वय ६० वर्षें,रा.कुणघाडा, विमलाबाई गव्हारे वय ६० वर्षें,रा. कुणघाडा,तर जखमींची नावे-गुरुदेव कुणघाडकर वय ६० वर्षें रा. भाडभीडी,सुधाकर कुणघाडकर वय ६० वर्षें,रा. भाडभीडी,वेदांत वैरागडे वय २२ वर्षे,रा.भाडभीडी,
प्रतिमा मानमुडकर वय ३५ वर्षें,रा.गिलगाव,निखिल दराडे वय १७ वर्षे,रा.भाडभीडी,संजय वैरागडे वय १७ वर्षें रा. भाडभीडी,कुणाल कन्नाके वय २१ वर्षें,रा.भाडभीडी,रेखा चलाख वय ५५ वर्षें,रा.जुनोना,अमर चलाख वय ५७ वर्षें रा.जुनोना,देवाजी गव्हारे वय ५५ वर्षे,रा.कुणघाडा व गुरूदास वासेकर वय ६० वर्षें,रा.भिवापूर अशी जखमींची नावे असून यातील काही जखमिंची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,एमएच ४६ पी ५३९२ क्रमांकाचे स्कॉर्पिओ वाहन रामपूर येथील विवाह सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होते.स्कॉर्पिओ वाहनात तब्बल १६ जण प्रवास करत होते.दरम्यान, एमएच १५ सीके ५००५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स गडचिरोली वरून कोणसरी येथील कर्मचारी वर्गाला घेऊन निघालेली असतांनाच कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळील वळण मार्गावर दोन्ही वाहने एकमेकांना धडकली.धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ वाहनाचा समोरील भाग चक्काचूर होऊन वाहनात अनेकजण अडकून पडले होते.घटना घडताच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर गंभीर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.अश्यातच दोघांचा वाटेतच मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

काय सांगता..? फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला झोडपले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-'शासकीय काम अन् काही दिवस थांब ' हे ठीक आहे.पण,एखादा काम बिघडला अन् संयमाचा बांध फुटला,तर समोरील व्यक्ती कोण? याचा जराही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!