Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीनिवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करा अन्यथा कारवाई...

निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे पालन करा अन्यथा कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहेत.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.शासकीय कार्यालये, विश्रामगृहे आदी परिसरात मिरवणुका काढण्यास,घोषणा देणे,सभा घेणे आदींवर निर्बंध आहेत. शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपीकरण करता येणार नाही.तसे आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करताना ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या,वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे १०० मीटर परिसरात व दालनात ५ व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहणार आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह वापरणे,आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे बंधनकारक आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे २०० मीटर परिसरात धरणे आंदोलन,मोर्चा,निदर्शने,उपोषणे करण्यावर निर्बंध आहे.धार्मिक स्थळे,रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करता येणार नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात,धर्म,भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध आहे. निवडणुकीच्या प्रचाराकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक,झेंडे लावणे आदी बाबींवर निर्बंध आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खासगी व्यक्तींच्या जागेवर,सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावता येणार नाही.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार,रॅली, रोड-शो याकरिता वाहनाच्या ताफ्यात १० पेक्षा अधिक मोटार गाड्या वापरता येणार नाहीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!