Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील बेचाळीसाव्या सत्रात आरमोरीच्या ज्योती म्हस्के विजयी...

नाट्यश्री कविता स्पर्धेतील बेचाळीसाव्या सत्रात आरमोरीच्या ज्योती म्हस्के विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोली च्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे बेचाळीसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवयित्री ज्योती म्हस्के यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवयित्री व त्यांच्या “ज्योतीचा प्रकाश” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,  व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
ज्योती म्हस्के हे आरमोरी,जि.गडचिरोली येथील रहिवासी असून प्राथमिक शिक्षीका आहेत.त्या प्रसिद्ध कवयित्री आहेत.त्यांना कविता,सुविचार लिहीण्याचा छंद आहे.वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रांतून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बेचाळीसाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.रोहिणी पराडकर,प्रा.पी.एस.बनसोडे,राजेंद्र यादवराव सोनटक्के,ज्योती म्हस्के,अजय राऊत,लता शेंद्रे,माधुरी अमृतकर,वंदना सोरते,संगीता ठलाल,संतोष कपाले, सुभाष धाराशिवकर,वामनदादा गेडाम,कृष्णा कुंभारे, तुळशीराम उंदीरवाडे,मुर्लीधर खोटेले,जयराम धोंगडे,  यामिनी मडावी,डॉ.मंदा पडवेकर,राजरत्न पेटकर, मधुकर दुफारे,रेखा दिक्षित,पी.डी.काटकर,शैला चिमड्यालवार,केवळराम बगमारे,खुशाल म्हशाखेत्री, नरेंद्र गुंडेली,सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!