Monday, July 13, 2026
Homeनागपूरनागपुरातील बाजारपेठेत बॉम्ब ठेवण्याच्या धमकीचा फोन…-नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणा अलर्ट मोडवर…

नागपुरातील बाजारपेठेत बॉम्ब ठेवण्याच्या धमकीचा फोन…-नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणा अलर्ट मोडवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी बाजारातील दुकानात ४ तारखेला बॉम्ब ठेवणार असा फोन ११२ वर आल्याने खळबळ उडाली आहे.पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोध पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली.मात्र,बाजारपेठेत काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही.खबरदारी म्हणून बाजारपेठेत गस्त वाढवण्यात आली आहे.

सीताबर्डी बाजारातील मोदी नंबर २ आणि मोदी नंबर ३ बाजार ओळीमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याचे म्हटले आहे.यात पोलिसांना फोन आलेल्या नंबरची माहिती मिळाली असून या बाबत त्या नंबर वरून नेमका कोणी फोन केला; याचा तपास सुरू असल्याची माहिती बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी दिली आहे.

नागपूरमधील सीताबर्डी बाजार नेहमीच गजबजलेला असतो.नागपूरकर सीताबर्डीत मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात.सणासुदीच्या काळात तर बाजारपेठ फुलून गेलेली असते.त्यात ४ जून रोजी लोकसभेचा निकाल आहे आणि याच दिवशी या गजबजलेल्या बाजारपेठेत बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे.त्यामुळे तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि भागात तपासणी केली.मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.दरम्यान याआधीही अशा अफवा पसरवण्याच्या घटना समोर आल्या आहेत.कुणीतरी खोडसाळपणा केल्याचा संशय असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!