- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलिस ठाण्याजवळ नक्षलवादी घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली.त्यानुसार नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन)एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या ३०० जवानांचे विशेष पथक व केंद्रीय राखीव दलाच्या पथकाने
आज,शुक्रवार २३ मे रोजी सकाळच्या सुमारास कवंडे आणि नेलगुंडा येथील इंद्रावती नदी काठ व जंगल परिसरात शोधमोहीम राबवली.दरम्यान,नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अचानक अंधाधुंद गोळीबार सुरू केला असता सी-६० च्या जवानांनी जश्यास-तसे प्रत्युत्तर देत तब्बल दोन तासाच्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांना सळो की,पळो करून सोडले.अश्यातच चकमकीनंतर परिसरात राबविण्यात आलेल्या शोधमोहीमेत ४ जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह,एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR),दोन ३०३ रायफल आणि एक भरमार बंदूक,वॉकी टॉकी,छावणी साहित्य व इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले असून परिसरात आणखी शोध मोहीम सुरू आहे.त्यामुळे ठार झालेल्या नक्षलींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याबाबत लवकरच अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

