Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षली संघटनेला धक्का; लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या 'सुनीता' ने शस्त्रे सोडून पत्कारली...

नक्षली संघटनेला धक्का; लाखो रुपयांचे बक्षीस असलेल्या ‘सुनीता’ ने शस्त्रे सोडून पत्कारली शरणागती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील गोमवेटा गावची रहिवासी असलेल्या  ‘सुनीता’ नामक महिला नक्षलवादीने मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील पितकोना पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या चिलोरा कॅम्प येथील पोलिसांपुढे आज मंगळवारी शरणागती पत्करली असून यामुळे  नक्षलवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. आत्मसमर्पण केलेल्या सुनीतावर शासनाने बालाघाट जिल्ह्यात १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.राज्यात नक्षलवाद्यांवर वाढलेल्या पोलीस दबावामुळे सुनीताने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.विशेष म्हणजे,१९९२ नंतर पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यातील महिला नक्षलवादीने मध्य प्रदेश शासनासमोर अशा प्रकारे स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे.सुनीता ही २०२२ मध्ये नक्षलवादी संघटनेत सामील झाली होती.त्यावेळेस ती एमएमसी झोनची सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होती.
छत्तीसगडच्या माड क्षेत्रात तिने सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले होते.त्यानंतर तिला सीसी मेंबर रामदेरच्या क्षेत्रात गार्ड म्हणून महत्त्वाचे काम देण्यात आले होते.सुनीताचा कोणकोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग होता,याबद्दल तिची कसून चौकशी करण्यात येईल,असे संजय कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!