Saturday, August 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रकला उडवण्यासाठी घडवून आणला आयईडी स्फोट ...-दोन जवान शहीद…

नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रकला उडवण्यासाठी घडवून आणला आयईडी स्फोट …-दोन जवान शहीद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीगडमध्ये लष्कर,निमिलष्कर दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.त्यामुळे सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला आहे.या स्फोटात वाहनचालक आणि त्याचा सहकारी असे दोन जवान शहीद झाले आहेत.लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली आहे.छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला.जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून २०१ कोब्रा कॉर्म्सची तुकडी टेकलगुडेम येथे जात होती.या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता.सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.आज, रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास या मार्गावर ट्रक जाताच आयईडीचा स्फोट झाला आणि वाहनचालक आणि त्याचा सहकारी शहीद झाले. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत.या स्फोटात काही सैनिक जखमी आहेत. नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी या परिसरात शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!