उद्रेक न्युज वृत्त :-कुठलीही परवानगी न घेता नियमित प्रार्थना-संध्या,धार्मिक कार्यक्रम,अजान,प्रवचन व विविध सणांच्या कालावधीत गत काही वर्षांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात भोंग्यांचा (लाऊड स्पीकर) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा यामध्ये ध्वनीमर्यादेचा भंग होतो,विशेषतः रात्रीच्या वेळी.यामुळे आजारी नागरिक,वृद्ध,लहान मुले,विद्यार्थ्यांना झोप व अभ्यासात अडथळा निर्माण होतो.या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व उच्च न्यायालयाने वेळोवेळी आदेश जारी करून ध्वनिप्रदूषण रोखण्याचे निर्देश दिले असतांनाही काहीजण याला जुमानत नव्हते.अश्यातच राज्यभरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याने नुकतेच मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सदरचा मुद्दा उचलून धरण्यात आला.आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.यावेळी आमदार आदित्य ठाकरे,भास्कर जाधव,देवयानी फरांदे,जितेंद्र आव्हाड, विश्वजीत कदम,सना मलिक यांनीही चर्चेत सहभाग घेतला होता.त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कुठेही पुन्हा विनापरवानगी भोंगा लावल्यास,त्या भागातील संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली आहे.जंगल परिसरात कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवण्यास बंदी असेल. यासाठी वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी सर्व पोलीस आयुक्तांच्या कार्यालयांतर्गत विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली असून ते भोंग्यांविरोधात तात्काळ कारवाई करतील.भोंग्यांवर कारवाईसाठी प्रमाणित कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे.ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून ध्वनीप्रदुषणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरातील पोलिस प्रशासनाला कारवाईचे आदेश देण्यात आले असून धार्मिक स्थळांना विनापरवानगी लावलेले भोंगे तातडीने काढण्यात येत आहेत. ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या आवाजावर थांबा..! – ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्यांवर होणार गुन्हे दाखल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

