- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या केली.सुनील अमृत भिल,त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांची दोन मुले इयत्ता दुसरीत शिकणारा सनी भिल व अंगणवाडीत जाणारा राज भिल अशी मृतकांची नावे असून आज पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्याने सदरची घटना सर्वत्र उघडकीस आली.घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय निकम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे,हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील,विजय भोई,योगेश बागुल,राहुल पाटील यांना पंचनाम्यासाठी पाठवले.चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. सध्या पोलिस या सामूहिक आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र,प्राथमिक चर्चेत कौटुंबिक वाद वा इतर आर्थिक बाबींमुळे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.पोलिसांच्या सखोल तपासाअंतीच सर्व सत्य उघड होणार आहे.
- Advertisement -

