Thursday, October 22, 2026
Homeगडचिरोलीदेशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत प्रथमच स्व-गणना सुविधा..

देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेत प्रथमच स्व-गणना सुविधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारतातील पहिली डिजिटल जनगणना म्हणून ओळखली जाणारी जनगणना-२०२७ ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि व्यापक प्रक्रिया असून,यात स्व-गणनेच्या माध्यमातून सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जनगणना-२०२७ ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिला टप्पा–घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे.त्यानंतर दुसरा टप्पा–लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार आहे.या संपूर्ण प्रक्रियेत अचूक व विश्वसनीय माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे.
यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-गणना(Self Enumeration)ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे.ही सुविधा १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत उपलब्ध राहणार आहे.स्व-गणना पूर्ण केल्यानंतर मिळणारी Self Enumeration ID (SE ID)जतन करून ठेवणे आवश्यक असून,प्रगणक घरी आल्यावर ही ID त्यांना देणे बंधनकारक राहणार आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या स्व-गणना सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.या उपक्रमामुळे नागरिकांना जनगणनेच्या कार्यात थेट सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे.
जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील दहा वर्षांसाठी शिक्षण,आरोग्य,पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा,रेशन तसेच रोजगार योजनांच्या प्रभावी नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती नोंदवणे ही आपली जबाबदारी समजून सहभाग नोंदवावा,असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्व-गणना प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तहसील कार्यालय किंवा नगर परिषद/नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.सर्वांनी जबाबदारी ओळखून जनगणना-२०२७ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून जिल्ह्याची जनगणना यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!