उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल; असे त्यांनी आज दिनांक-५ जून रोजी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मी सर्व जबाबदारी स्वीकारतो भाजप नेतृत्वाने विधानसभेसाठी मोकळीक द्यावी; काही त्रुटी असतील,त्या कमतरता भरून काढण्यासाठी सरकारमधून मला मोकळीक द्यावी; मी संघटनेसाठी काम करेल, आमच्या सरकारमधील टीमला माझे सहकार्य राहील; असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा एकट्या भाजपने जास्त मिळवल्या आहेत.भाजप आणि इतर पक्ष मिळून सरकार तयार होत आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ४३ टक्के मते मिळाली.तर,आम्ही फक्त अर्धा टक्क्याने मागे राहिलो. यामध्ये महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख मते मिळाली.तर महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली.मुंबईमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक जागा मिळाल्या.
२०१९ आणि २०२४ च्या निवडणूकीतील मतांचे वर्गीकरण करताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपला २७.८४ टक्के मते मिळाली होती.तर, यंदाच्या निवडणूकीमध्ये भाजपला २६.१७ टक्के इतकी मते मिळाली.तर, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला १६.४१ टक्के मिळाली होती.यामध्ये त्यांच्या १३ जागा निवडून आल्या होत्या.महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चुरशीने निवडणूका झाल्या यामध्ये आमच्या ८ जागा ४ टक्के मताने पडल्या असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

