Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीदीव्यांग प्रमाणपत्रासाठी नोंदणी न केलेल्या व्यक्तिंनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन..

दीव्यांग प्रमाणपत्रासाठी नोंदणी न केलेल्या व्यक्तिंनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि शासनाकडे त्यांचा अद्ययावत डाटाबेस उपलब्ध रहावा,यासाठी विशेष पोर्टल अद्ययावत करण्याच्या सूचना गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.दिव्यांगांच्या नोंदणीसाठी https://zpgadchirolidivyangsathi.com/ हे पोर्टल सुरू करण्यात आले असून,आतापर्यंत ग्रामीण भागातील ६ हजार दिव्यांगांनी यावर नोंदणी पूर्ण केली आहे.शहरी भागातील दिव्यांग्य व्यक्तींनी यावर नोंदणी करावी.
शासनाकडून जिल्ह्यातील ११ हजार १३६ दिव्यांगांना युडीआयडी (Unique Disability ID) देण्यात आले आहे.मात्र,अद्यापही काही दिव्यांग व्यक्तींनी नोंदणी केलेली नाही.अशा व्यक्तींनी तसेच युडीआयडी प्राप्त मात्र अद्याप नोंदणी न केलेल्या दिव्यांग व्यक्तिंनीही यावर लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.दिव्यांग कल्याण समितीच्या आढावा बैठकीत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष गाडे,समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज तसेच विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सहज मिळावा,जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारण्यात यावे,तसेच घरकुल योजनेंतर्गत दिव्यांगांना प्राधान्याने मंजुरी द्यावी,यासंबंधीही बैठकीत चर्चा करण्यात आली.दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अधिकृत डाटाबेसमध्ये आपला समावेश करून घेण्यासाठी https://zpgadchirolidivyangsathi.com/ या पोर्टलवर स्वतः किंवा जवळच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन त्वरित नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!