Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीदर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजन करण्याचे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना..

दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजन करण्याचे गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शाळांना दर्जेदार स्वरूप मिळावे यासाठी नवीन वर्गखोल्या,किचन शेड,विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहे,सुरक्षेच्या दृष्टीने कंपाऊंड वॉल आणि सिसिटिव्ही यंत्रणा यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी शिक्षण विभागाने प्रभावी नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शाळा सक्षम व सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेला निधी,नियोजन आणि धोरणात्मक बदलांबाबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सविस्तर आढावा घेतला.प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार(प्राथमिक)आणि वासुदेव भुसे (माध्यमिक)यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी विचारणा केली की, शाळा सुरक्षित करण्यासाठी निधी देण्याच्या लेखाशिर्षात धोरणात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे काय?विशेषतः ज्या भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे,तेथे वर्गखोल्या व किचन शेड या वेगळ्या तांत्रिक पद्धतीने बांधता येतील कां? यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत मंजूर निधीतून किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत,किती प्रलंबित आहेत आणि त्यामागची कारणे काय आहेत,याचीही माहिती त्यांनी घेतली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लोकसहभागातून शाळांमध्ये सिसिटिव्ही बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.बैठकीत समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता रविंद्र भरडकर,प्रशांत ढोंगे, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे,मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर व संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!