Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततब्बल १० वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका.. -आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला...

तब्बल १० वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका.. -आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला झाली सुरुवात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षानंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. घाटीतून कलम ३७० हटवल्यानंतर लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी काश्मीरची जनता आज,१८ सप्टेंबरला ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार बनत आहे.जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत.यातील पहिला टप्पा आजपासून सुरु झाला असून यात ७ जिल्ह्यांच्या २४ विधानसभा जागांवर निवडणुका होत आहेत.यात एकूण २१९ उमेदवार रिंगणात आहेत.मतदानासाठी ३ हजार २७६ पोलिंग स्टेशन बनवण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत काश्मिरी पंडीतदेखील मतदान करण्यासाठी उतरले आहेत.३५ हजारहून अधिक विस्थापित काश्मीरी पंडिंतांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे.ईव्हीएमच्या माध्यमातून व्यक्तिगत रुपात मतदानाचा पर्याय निवडणाऱ्या प्रवासी काश्मीरी मतदारांना २४ मतदान केंद्रात ही सुविधा मिळेल. निवडणूक शांततापूर्ण पार पाडावी; यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.२३ लाखांहून अधिक पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.९० अपक्ष उमेदवारांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!