Saturday, September 26, 2026
Homeएटापल्लीतब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांचा धान घोटाळा उघड-गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील घटना…

तब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांचा धान घोटाळा उघड-गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली(गडचिरोली) :- तालुक्यातील हेडरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान खरेदी केलेल्या व्यवहारात तब्बल १ कोटी ३७ लाख रूपयांच्या धानाची तफावत आढळली.धानाच्या अफरातफर प्रकरणी सखोल चौकशीअंती आविका संस्थेचे अध्यक्ष,सचिव तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसह एकूण पाच जणांवर गुरुवारी आलदंडी पोलिस मदत केंद्रात गुन्हा दाखल करण्यात आला.

खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये हेडरी धान खरेदी केंद्रावर ६७१५.३३ क्विंटल म्हणजेच १२ हजार ९९८ पोती धानाचा साठा कमी आढळला.२०२४ रूपये प्रति क्विटल दराने १ कोटी ३६ लाख ९९ हजार १७३ रूपये २० पैसे,तसेच बारदान्याचे ४ लाख २५ हजार ८१४ रूपये ४८ पैसे,असे एकूण १ कोटी ३७ लाख २५ हजार ८७ रूपये ६८ पैसे एवढी तफावत आढळली. धानाच्या अफरातफर प्रकरणी १२ जानेवारीला आदिवासी विकास महामंडळ अहेरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक (उच्च श्रेणी) बी.एस.बरकमकर यांनी आलदंडी पोलिसांत तक्रार दिली.त्यानुसार आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर सुकू पुंगाटी,सचिव किशोर पदा,केंद्र प्रमुख सुरेश पुंगाटी,मदतनीस प्रदीप दुर्गे तसेच आदिवासी विकास महामंडळ कार्यालय अहेरीच्या प्रभारी विपणन निरीक्षक सोनाली पेंदाम यांच्याविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पाचही आरोपींविरोधात भादंवि कलम ४०६,४०९,४२०,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!