Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरतब्बल दीड वर्षांनी नोंदवली बलात्काराची तक्रार; न्यायालयाने खटलाच केला खारीज..

तब्बल दीड वर्षांनी नोंदवली बलात्काराची तक्रार; न्यायालयाने खटलाच केला खारीज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-काही महिला सर्वकाही सुरळीत सुरू असतांनाच रागाच्या भरात अनेकांना कायद्याच्या कचाट्यात पकडुन वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू पाहतात आणि हल्ली अनेक पुरुषांच्या बाबतीत असे घडतांना दिसून येत आहे.मात्र,कायद्याची प्रभावी मांडणी आणि न्यायपालिकेला पटवून दिलेला युक्तिवाद हा कधीही निष्फळ ठरत नसतो.अश्याच प्रकारे एका विवाहित महिलेने तब्बल दीड वर्षांनी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार पोलिसांत दाखल केली.त्यानुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर(प्रथम खबरी अहवाल)नोंदवून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी)न्यायालयात खटला दाखल केला होता.प्रकरणी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आणि खटल्याची बाजूच पलटली.ज्ञानेश्वर देवराव साबळे वय ४४ वर्षे, रा.समुद्रपूर,जि.वर्धा असे आरोपीचे नाव असून आरोपीने ५ मे २०२३ रोजी बलात्कार करून ठार मारण्याच धमकी दिली, अशी तक्रार महिलेने २८ डिसेंबर २०२४ रोजी केली होती.त्यावरून गिरड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.अश्यातच आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाची मागणी केली.आरोपीतर्फे ॲड.एस.ओ.अहमद यांनी बाजू मांडली आणि महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन केले.परिणामी,तक्रारीवर संशय उत्पन्न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी वादग्रस्त एफआयआर व खटला रद्द केला.विशेष म्हणजे, महिलेने तिच्यावरील बलात्काराची तक्रार करण्यासाठी तब्बल दीड वर्ष विलंब केला.त्यातच,बलात्कारसारखे गंभीर प्रकरण असतांनाही विलंबाचे कोणतेही ठोस कारणही दिले नाही,तसेच माहिती देण्यात विसंगती आढळून आली.न्यायालयाच्या लक्षात येताच संपूर्ण खटलाच खारीज केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!