Sunday, September 6, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त'जागो ग्राहक जागो..!' ग्राहक आयोगाच्या आदेशाची अवहेलना; पतसंस्थेच्या अध्यक्षाला दोन वर्षे कारावास..

‘जागो ग्राहक जागो..!’ ग्राहक आयोगाच्या आदेशाची अवहेलना; पतसंस्थेच्या अध्यक्षाला दोन वर्षे कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ग्राहक आयोग हा प्रत्येक ग्राहकांचे हक्क,अधिकार,निर्णय आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी कटिबध्द असून ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ,असे मानले जाते.आयोगाच्या वतीने देण्यात येणारे निर्णय हे बऱ्यापैकी ग्राहकांच्या बाजूनेच लागलेली आहेत.त्यामुळे आयोगाने दिलेले निर्णय कुणीही हलक्या घेता कामा नये.मात्र,काहीजण याकडे कानाडोळा करून मनमर्जीने कामे करू पाहतात.अश्याच प्रकारे नुकतेच यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने दिलेल्या निर्णयात यवतमाळ येथील स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षाने दुर्लक्ष करून ग्राहक आयोगाच्या आदेशाची अवहेलना केली.प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष तथा प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकारी डॉ.रवींद्र उल्हास मराठे यांनी पतसंस्थेच्या अध्यक्षाला दोन वर्षे साधा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.डॉ.रामप्रकाश हनुमानप्रसाद वैद्य असे शिक्षा सुनावलेल्या आरोपी पतसंस्थेच्या अध्यक्षाचे नाव आहे.सदरची शिक्षा ही यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने काल मंगळवारी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की,खातेदार उषा राजेंद्र सुपारे यांनी यवतमाळ येथील स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदतठेवीत रक्कम गुंतविली होती. ही रक्कम देण्यास पतसंस्थेने टाळाटाळ सुरू केल्याने त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात २०१९ मध्ये तक्रार दाखल केली.३० जून २०२२ रोजी यावर निर्णय देण्यात आला.उषा सुपारे यांना मुदतठेवीचे ५ लाख ९ हजार ९८७ रुपये ८ टक्के व्याज दराने द्यावे,तसेच मानसिक त्रास व तक्रार खर्चाचे १ हजार रुपये देण्यात यावे,असा आदेश आयोगाने दिला होता.मात्र,पतसंस्थेने आयोगाच्या निर्णयाची पूर्तता केली नाही.आदेश देऊनही पत संस्थेच्या वतीने कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने आदेशाची अवहेलना करण्यात आली. आदेशाची अवहेलना झाल्याने उषा सुपारे यांनी आयोगाकडे दाद मागितली.पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त शिक्षा आणि दंड ठोठावण्याची विनंती केली.आयोगाने अध्यक्षांना नोटीस पाठविल्यानंतरही अध्यक्ष सतत गैरहजर राहिले.आदेशाची पूर्तता न केल्याने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम २७ अन्वये दोषी ठरविण्यात आले आणि काल मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र मराठे,सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली.सुनावणीत ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.रामप्रकाश वैद्य यांना २ वर्षे साधा कारावास,१० हजार रुपये दंड,दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने साधा कारावास,अशी शिक्षा ठोठावली आहे.आयोगाच्या आदेशानुसार डॉ. वैद्य यांनी एक दिवस तुरुंगात घालविला आहे.फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम ४२८ नुसार एकूण दिलेल्या शिक्षेत हा एक दिवस समाविष्ट करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!