Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीजागतीक महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन- महिलांनी नोंदणी करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

जागतीक महिला दिनानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन- महिलांनी नोंदणी करण्याचे क्रीडा विभागाचे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.पुरातन काळापासुनच स्त्रीला अनन्य साधारण महत्व असुन स्त्री ही अनंत काळाची माता आहे असे संबोधीले जाते.या उक्तीस अनुसरुन ८ मार्च हा दिवस जागतीक महिला दिन म्हणुन राज्यात सर्वत्र साजरा केला जातो.सदर महिला दिनाचे औचित्य साधुन शालेय मुली,महाविद्यालयीन युवती व सर्व महिलांध्ये तंदुरुस्ती व आरोग्य या बाबत जागृकता निर्माण करण्याकरीता मुलींना अधिकाअधिक क्रीडा विषयक सोई सुविधा,मोकळे वातावरण,कौशल्याची संधी,मुलींच्या आरोग्य न्युट्रेशन,योग्य सवयी उपलब्ध करुन दिल्यास स्त्रीयांची पर्यायाने कुटुंबाची सुधारणा होऊन सशक्त समाज उभा राहील.

केंद्र शासनाच्या २० फेब्रुवारी २०२३ च्या मार्गदर्शक सुचनेनुसार ८ मार्च या दिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरावर शालेय व महाविद्यालयीन युवती व महिला करीता १० मार्च ते २५ मार्च २०२३ 

या कालावधीत १०० व २०० मीटर धावणे,कबड्डी, खो-खो,व्हॉलीबॉल,बॅडमिंटन,बॉक्सिंग,टेबल-टेनिस, सुर्यनमस्कार,स्वसंरक्षण दावपेच इत्यादी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजीत करण्यात येणार आहे.याकरीता शालेय व  महाविद्यालयीन युवती व महिला यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे तसेच सहभागी होणाऱ्या संघांनी, युवक,युवतींनी, महिलांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी १० वाजेपर्यंत आपल्या  सहभागाबाबतची नोंद निश्चित करुन घेण्यात यावी.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आज ८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महिला दिना निमीत्य जिल्हा क्रीडा संकुल,क्रीडा व सांस्कृतीक भवन,कॉम्पलेक्स गडचिरोली येथे साजरा करण्यात येणार आहे.याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात व इतर विविध क्षेत्रात उत्तम कागगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार असून याप्रसंगी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी,युवक-युवतींनी उपस्थित राहावे; असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!