- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गेल्या काही दिवसांपासून जंगली हत्तींनी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यात धुडगूस घालत शेतातील पिकांची नासधूस केली.हत्तींच्या कळपामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान,काल गुरुवारच्या सकाळी हत्तींच्या कळपाचे लोकेशन गोंदिया जिल्ह्यातील केशोरी वनक्षेत्रात आढळून आले. अश्यातच तब्बल २० हत्तींच्या कळपाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या येथील शेतशिवारातील मक्याचे पीक उद्ध्वस्त करून हत्तींनी लगतच्या जंगलात ठाण मांडल्याचे बोलले जात आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.बुधवारी
रात्रीच्या वेळी हत्तीच्या कळपाने शिवारातील उभ्या मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.केशोरी परिसरात हत्तीच्या कळपाचे आगमन झाल्याचे समजताच वनविभाग सज्ज झाला आहे.कुरखेडा मार्गावरून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात हत्तीच्या कळपाचा बुधवारच्या रात्री प्रवेश झाला असून,अंदाजे २० ते २५ हत्ती असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वनविभागाचे पथक या कळपावर सतत नजर ठेवत असून स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

