Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीजंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,बुधवार २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास गडचिरोली-चांदाळा मार्गावर घडली.नागसेन साखरे वय ४० वर्षे,रा.शिवणी (वैरागड),ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.तर राजेश जगन्नाथ रोहनकर वय ४० वर्षे,रा.फुले वॉर्ड,गडचिरोली असे गंभीर जखमीचे नाव आहे.
नागसेन साखरे व राजेश रोहनकर हे दोघेही आज सायंकाळच्या सुमारास गडचिरोलीहून दुचाकीने चांदाळा गावाकडे जाण्यासाठी निघाले होते.सदरचा मार्ग हा जंगल परिसराने वेढलेला असल्याने मार्गावरून जात असतांनाच जंगल परिसरातून मार्गक्रमण करणारा जंगली डुक्कर दुचाकीला येऊन धडकला.यात दुचाकीवरील नागसेन व राजेश खाली कोसळून नागसेन साखरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.यातच त्यांचा मृत्यू झाला,तर राजेश यांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली.दरम्यान,मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी दोघांनाही तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती नागसेन यांना मृत घोषित केले,तर राजेश यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेने साखरे कुटुंबियांवर मोठा आघात केला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!