Monday, May 4, 2026
Homeगडचिरोलीचुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुरस्कार...

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी येथे राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या यंदाचा डॉ.प्रवीण चाळक पुरस्कृत सयाजी चाळक स्मृती शिवांजली साहित्य सन्मान(प्रौढ नाट्य)नाट्यलेखन पुरस्कार-२०२६ प्रदान करण्यात आला.गडचिरोली येथील चुडाराम बल्हारपुरे यांना या वर्षी ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाटकास मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे,तर राज्यस्तरावर इतर साहित्यासह मिळालेला यंदाचा हा ११ वा पुरस्कार आहे.
शिवांजली साहित्य पीठ,चाळकवाडी,ता.जुन्नर,जि. पुणे यांचे वतीने दरवर्षी साहित्यिकांकरीता राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा आयोजित करण्यात येते व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना संस्थेच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.राज्य स्तरावर अत्यंत दर्जेदार व प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्कारासाठी यावर्षी दोनशेच्या वर साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात २२ साहित्यिकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून मराठी नाट्यवाड्.मय प्रकारात प्रसिद्ध ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री पुणे प्रकाशित जत्रा घडली नागोबाची या ग्रामीण लोककथेवर आधारित महानाट्यास यंदाचा डॉ.प्रवीण चाळक पुरस्कृत सयाजी चाळक स्मृती शिवांजली साहित्य सन्मान (प्रौढ नाट्य)नाट्यलेखन पुरस्कार -२०२६ प्रदान करण्यात आला.
शिवांजली साहित्य संकुल,चाळकवाडी-पिंपळवंडी येथील राष्ट्रसंत गाडगे महाराज साहित्य नगरी येथे झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सवात डॉ.पंडित विद्यासागर(कुलगुरु,स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ,नांदेड,विज्ञान अभ्यासक व ज्येष्ठ भाषा अभ्यासक),डॉ.केशव सखाराम देशमुख(ज्येष्ठ साहित्यिक व भाषा अभ्यासक),डॉ.संजय बोरुडे (मराठी भाषा तज्ञ व अभ्यासक),इंजि.शिवाजी चाळक,(संस्था प्रवर्तक,स्पर्धाप्रमुख व प्रसिद्ध साहित्यिक कवी),प्रतिष्ठित बाळकृष्ण चाळक,अनिल तात्या मेहेर,जितेंद्र गुंजाळ, वल्लभ शेळके, अंकुश सोनवणे,गणेश वाघ,मनोज चाळक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन संदीप वाघोले व बाबासाहेब जाधव यांनी केले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल विदर्भात आणि राज्य स्तरावर सर्वत्र कौतुक होत असून प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,रमेश निखारे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक),ओमप्रकाश शिव(हिन्दी साहित्यिक),मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) तसेच गडचिरोली जिल्ह्यातील व झाडीपट्टीतील रंगकर्मी, साहित्यिक तथा पत्रकार मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव करत अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!