उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- गोंदिया तालुक्यातील मुरपार येथील ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून निधी उपलब्ध असून केवळ कमिशनसाठी मजुरांची मजुरी देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.गेल्या महिनाभरापासून मजुरांना मजुरी न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याप्रकरणात आमदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
गोंदिया तालुक्यातील मुरपार येथे आमदार निधीअंतर्गत तीन महिन्यांपूर्वी तीन लाख रुपयांच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते.या कामावर आठ मजुरांनी काम केले होते.कामासाठी मजुरांना मजुरी देण्यासाठी निधीसुद्धा ग्रामपंचायकडे महिनाभरापूर्वीच प्राप्त झाला आहे.गेल्या महिनाभरापासून मजूर मजुरी मागण्यासाठी ग्रामसेवकाकडे जात आहे.पण आधी कमिशन द्या; नंतर मजुरी देतो; अशी भूमिका ग्रामसेवकाने घेतली असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.
माहितीनुसार ७ मे रोजी ग्रामपंचायत मुरपारच्या सामान्य फंडात ८१ हजार रुपये जमा आहे.पण ही रक्कम मजुरांच्या बँक खात्यावर जमा करण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत असल्याने मजुरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.मजुरांनी या प्रकरणाची आमदार व पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून ग्रामसेवकार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
यशोदा दाऊदसरे,मजूर👇
तीन महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम करण्यात आले.याचे पैसेसुद्धा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ग्रामपंचायतच्या सामान्य फंडात जमा करण्यात आले. मात्र ग्रामसेवकाच्या कमिशनखोरीच्या धोरणामुळे मजुरांना मजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
आनंद पिंगळे, खंडविकास अधिकारी गोंदिया👇
मुरपार येथील ग्रामसेवकाची तक्रार प्राप्त झाली असून तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.चौकशीत दोषी आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल.

