Tuesday, August 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना.. - मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार..

गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना.. – मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शालेय शिक्षण असो वा महाविद्यालयीन,आई-वडिलांनंतरचे प्रिय गुरूजण  म्हणजे शिक्षक.ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवतो,असे शिक्षकच भक्षक होत असतील तर..अश्यांना काय म्हणावे?अश्याच प्रकारे गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे.एका आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने स्वतःच्याच शाळेतील दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या  असहय्यतेचा फायदा घेत दोनदा लैंगिक अत्याचार केला.सदरचे प्रकरण मुलीच्या आईच्या लक्षात येताच पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवण्यात आली.प्रकरणी  ५५ वर्षीय आरोपी मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे रा.सावर्डेकर कॉलनी,मुरगूड,ता.कागल,जि.कोल्हापूर याचेवर जुना राजवाडा पोलिसांनी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पॉस्को)आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून मुरगूड येथून अटक केली.नराधम मुख्याध्यापकास न्यायालयात हजर केले असता विशेष न्यायालयाने त्याला उद्या,शुक्रवार १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.विशेष म्हणजे,पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीचे वडील मृत पावले असून आजारी आई आणि बहीण असा पीडितेचा परिवार आहे.काही दिवसांपासून आईची तब्बेत बरी नसल्याने ती कागलहून आईकडे कोल्हापुरला राहायला आली असता, आजारपणाचा फायदा घेत मुख्याध्यापकाने पीडितेशी जवळीकता साधली.ऑगस्ट-२०२५ मध्ये पीडितेच्या घरी कुणीही नसल्याची संधी साधून पहिल्यांदा अत्याचार केला व नंतर ऑक्टोंबर-२०२५ मध्ये कोल्हापूर शहरातील आपल्या मुलाच्या फ्लॅटवर तिला बोलावून दुसऱ्यांदा अत्याचार केला.लागलीच मुलीच्या वर्तनात बदल झाल्याने आईने मुलीला विश्वासात घेत विचारले असता सदर प्रकार उघडकीस आला.लागलीच  पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करीत आहेत.प्रकरणी उद्याला नराधम मुख्याध्यापकास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!