Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीगळफास घेण्यापूर्वी पतीने व्हिडिओ बनवला अन् पत्नीचे बिंग फुटले.. - तब्बल एका...

गळफास घेण्यापूर्वी पतीने व्हिडिओ बनवला अन् पत्नीचे बिंग फुटले.. – तब्बल एका महिन्यानंतर प्रकरणाला नवे वळण; पत्नीवर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्याच्या गोगाव येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित पुरुषाने एक महिन्यापूर्वी तालुक्यातील दिभना येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.अशातच आता तब्बल एका महिन्यानंतर प्रकरणाला नवे वळण आले असून गळफास घेण्यापूर्वी विवाहित पुरुषाने मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला अन् पत्नीचे बिंग फुटले.त्यानुसार गळफास घेणाऱ्याच्या वडिलांनी मयताच्या पत्नीवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल केला.विवेक पुंडलिक भरडकर वय ३५ वर्षे, रा.गोगाव ता.गडचिरोली असे एका महिन्यापूर्वी आत्महत्या करणाऱ्या विवाहिताचे नाव आहे.
माहितीनुसार,विवेक हा गवंडीकाम करायचा.२०१३ मध्ये त्याचा विवाह निमगाव जि.चंद्रपूर येथील अल्का हिच्याशी झाला होता.लग्नानंतर काही दिवस सुखात गेले,नंतर पती पत्नीत कौटुंबिक कारणावरुन खटके उडू लागले.यातून काही दिवस ती माहेरी राहत होती. नातेवाईकांनी समजावल्यानंतर ती परत नांदण्यास आली.दरम्यान, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी पती-पत्नीत वाद झाला.१७ नोव्हेंबरला रोजी तो बाम्हणी येथे बांधकामावर कामासाठी गेला.नंतर तो परतलाच नाही. २४ नोव्हेंबरला त्याचा मृतदेह दिभना येथे
आढळला.विवेकने १७ नोव्हेंबरला आपल्या  मोबाइलमध्ये एक व्हिडिओ बनवला होता.त्यात त्याने पत्नी सतत चारित्र्यावर संशय घेते,तिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे; असे म्हटले होते.या व्हिडिओआधारे पुंडलिक भरडकर यांच्या फिर्यादीवरुन गडचिरोली ठाण्यात आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा नोंद झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!