- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या रानगर्भातील रानफुले या कवितेला समर्पित गृपवरुन सोमवार १४ जुलै पासून राज्यस्तरीय ‘नाट्यश्री मासिक कविता’ स्पर्धांना सुरुवात झाली आहे.यापूर्वी नाट्यश्रीच्या ‘रानगर्भ फुलत आहे’ या गृप वरुन वर्षभर आठवडी कविता स्पर्धा घेण्यात आल्या व त्यातील पुरस्कृत ६० कवींना नाट्यश्रीच्या वार्षिक समारंभात आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या कवितेला उत्कृष्ट कविता म्हणून पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले होते.यावेळी नाट्यश्रीने मासिक कविता स्पर्धा आयोजीत केली असून त्यात विजेत्या कवींना नाट्यश्री उत्कृष्ट कवी व कवितेला उत्कृष्ट कविता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.यासाठी दर महिण्याला तीन उत्कृष्ट कवींची निवड करण्यात येणार आहे.त्यांना प्रथम,द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून नियमित सहभागी सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा विनामुल्य असून केवळ कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासने हा संस्थेचा उद्देश आहे. झाडीपट्टीतील कवींना विशेष प्राधान्य दिले जाईल.
इच्छुक कवींनी स्पर्धेचे नियम अटी व इतर अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) व्हॉट्सॲप नंबर ९६२३६६३४३५ किंवा योगेश गोहणे (कविता विभाग प्रमुख)व्हॉट्सॲप नंबर ९४०२१२७२७३ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

