Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,गोंदियात होणार मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय…-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे...

गडचिरोली,गोंदियात होणार मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय…-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव युनूस शेख यांच्या प्रयत्नांना यश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-अल्पसंख्याकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे.या अंतर्गत विविध योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे.मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचा लाभ मुस्लीम, शीख,जैन,पारसी,ख्रिश्चन अशा धर्मातील बांधवांना मिळत असून सध्या स्थितत महामंडळाचे कामकाज चंद्रपूर येथील कार्यालयातून चालविण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली व गोंदिया येथील जनतेला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.दोन्ही जिल्ह्यातील जनतेला महामंडळा मार्फत विविध योजनांचा लाभ त्याच जिल्ह्यात मिळावा; यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव युनूस शेख,प्रदेश उपाध्यक्ष नाना नाकाडे तसेच गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यामध्ये मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय व्हावे व दोन्ही जिल्ह्यातील जनतेला त्रास होऊ नये; याकरीता निवेदनाद्वारे मागणी करून साकडे घातले होते.त्यानुसार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जनतेची कळकळ लक्षात घेता; व्यवस्थापकीय संचालक,मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित,मुंबई यांना पत्र पाठवून यासंदर्भात अवगत केले.लगेच व्यवस्थापकीय संचालकांनी आदेश काढून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याकरीता मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळा करीता मंजुरी दिली आहे.आत्राम यांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना कार्यालय सुरु करण्यासाठी अखत्यारितील जागेपैकी ४०० ते ५०० चौ.फुट क्षेत्रफळाची कार्यालयीन जागा उपलब्ध करुन देण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.लवकरच गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय होणार असल्याने जनतेला होणारा त्रास संपुष्टात येणार आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव युनूस शेख यांच्या पुढाकाराने हे सर्व शक्य झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील जनतेंनी आभार व्यक्त केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!