- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तळागळातील महिलांना मिळाला की नाही; यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे(कुंभारे) यांनी काल,शनिवार दिनांक-१४ सप्टेंबरला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावांना भेटी देत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान अंतर्गत लाडक्या बहिणींच्या दारी पोहचून आस्थेने विचारपूस करून घेतली.याप्रसंगी गडचिरोली विधानसभा महिला जिल्हा प्रमुख श्रीदेवी वरगंटीवार यांचे सह उपजिल्हाप्रमुख संगीता हर्षे,वैशाली किरमेजवार गडचिरोली शिवसेना महिला तालुका प्रमुख,धानोरा तालुका प्रमुख मेघा कोसरे,शहर प्रमुख शितल बनसोड सह शिवसेना महिला पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होत्या.सदर अभियाना प्रसंगी गडचिरोली शहरासह गावातील कुटुंबांना भेटी देऊन,कुटुंबातील महिलांची आस्थेने विचारपूस करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे होत आहे किंवा नाही आणि या योजनेचा लाभ,सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मिळाला किंवा नाही याबाबत गडचिरोली विधानसभा अंतर्गत,विविध गावातील आणि शहरातील,तब्बल २५ कुटुंबातील महिलांना भेटी देऊन,वर्षाताई मोरे (कुंभारे) यांनी विचारपूस केली.यावेळी शिवसेना महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- Advertisement -

